मोहे रंग दे

 


मनावर मळभ आलं की मी रंंगांचा आधार घेते. चित्रकला काही खूप दर्जा वगैरे नाहीये माझी. पण   शब्द थकतात तिथे रंग पुढे होऊन हात धरतात माझा. विचार अनेकदा आवाज चढवून बोलतात... पडझड करत राहतात. पण रंग आले की कसला तरी वचक बसल्यासारखे मागे होतात overthinkingचे बुलडोझर ...
रंग प्रवाही असतात, वाहून नेतात मनाच्या मर्यादा .. दु:खाची तंद्री लागते.  मग बाहेरचा अंधार कितीही गडद झाला तरी आत शांतपणे तेवत राहातात रंगांचे लामणदिवे..

#paintmeblue



Comments

Popular posts from this blog

RainbowMaker...

शब्द शब्द जपून ठेव... बकुळीच्या फुलापरी...

lockdown... लॉकडाऊन