RainbowMaker...

 I Paint My Own Rainbow.....


ब्लॉग लिहिणं ही सवय व्हायला हवी खरं म्हणजे- जसं आंघोळ करतो रोज, (अं.... नाही चुकीचं उदाहरण- नाही म्हणजे आता रोज करतोच. पण given a choice.... hahahahaha! असो..) जसं जेवतो.. (हां ! ही सवय नाही आवड सुद्धा आहे..bingo!!)  अगदी रोज नाही पण आठवड्यातून किमान एक ब्लॉग...

पण लेखकाचं मन फार विचित्र असतं. लेखक दुस-याच्या दु:खाने दु:खी होतो- लेखक समाजसेवक नसतो, (अपवाद) त्यामुळे तो उठून मदत वगैरे करायला जाईलच याची शाश्वती नसते- (पुन्हा, सन्माननीय अपवाद आहेतच) पण रायटर जळत राहतो आतल्या आत- जळती सिगरेट अर्धवट चुरडून टाकावी तसं  ब-या चाललेल्या दिवसातून अचानक बाजूला पडतो, विझून जातो- वरवर हसत राहतो पण आत उसवत राहतो...

गेल्या वर्षी मस्त चाललेला माझा असाच एक ब्लॉग सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याने बंद पडला.. किती दिवस खड्डा पडला होता पोटात. तो अभिनेता होता, हिरो होता क्युट होता म्हणून नाही.. लोक म्हणतील लाख, त्याच्यासाठी का आसवं गाळायची ? मुद्दा तो खरा कोण होता हा नव्हताच- एखाद्याच्या मृत्यूचा जो बाजार मांडला जातो तो बघून सुन्न झाले होते. `मिडीया, इंडस्ट्री, मित्र, शत्रू , fans अगदी घरच्यांनी सुद्धा सोडलं नाही- त्याच्या मरणाचे लचके तोडत राहिले सगळे जण गिधाडं बनून-

असो... भरकटायच्या आधी मुद्द्यावर आलेलं बरं- सो गेल्या वर्षी सुशांत- या वर्षी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने आणि तुफान भ्रष्टाचारामुळे माणसांचे गेलेले बळी! बेड्स ऑक्सिजन उपचार इंजेक्शन नाहीत म्हणून किडा मुंग्यांसारखी मरणारी माणसं बघितली, या सगळ्याचा काळाबाजार कळला, शुटींग पुन्हा बंद होणार आणि कलाकारांचे हाल कुत्रं खाणार नाही याची जाणीव झाली आणि पुन्हा आतला लेखक व्हेंटिलेटर वर गेला... मनातला त्रागा acidityसारखा जळजळ होऊन त्रास देऊ लागला आणि मग भसाभस ओकले सोशल मिडीयावर..

पण मग मायेच्या माणसांनी पाठीवरून हात फिरवावा, गुळाचा खडा भरवावा तसं मित्र मंडळींनी फोन केले मेसेजेस केले, चौकशी केली रागे भरले- आणि मन था-यावर आलं. शांत झालं.. लिहितं झालं.

परवा माझी लेक, अक्षरा चित्र काढत होती या सगळ्यात.. खाली खेळायला जाता येत नाही, उन्हाळी सुट्टी घरात बसून घालवावी लागते, शाळा गेल्या वर्षी सुद्धा online झाली आणि बहुतेक येणा-या वर्षी सुद्धा तशीच होईल या सगळ्याला शांतपणे accpet करून ती चित्र काढत होती. वेगळ्याच रंगाचं अर्ध वर्तुळ रंगवत होती- मी म्हटलं हे काये? तर म्हणाली- इंद्रधनुष्य! मी चित्र नीट पाहिलं पण ओळखीचे रंग दिसेनात- म्हणून म्हटलं हे कुठले रंग... 

तिने माझ्याकडे बघितलं स्माईल दिलं आणि म्हणाली- i paint my own rainbow mamma!


..... आसपासच्या सगळ्या ढगाळ हवेत- आता मला सुद्धा माझं स्वत:चं इंद्रधनुष्य रंगवलं पाहिजे.. 

yess.. Be it any Season, I will paint my own Rainbow!

-

love..

Ashu.....


image courtesy: Pinterest  

Comments

  1. Keep writing...
    You also Wrote your own rainbow...
    @ open minded space...

    ReplyDelete
  2. Keep writing...
    You also Wrote your own rainbow...
    @ open minded space...

    ReplyDelete
  3. Keep writing...
    You also Wrote your own rainbow...
    @ open minded space...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शब्द शब्द जपून ठेव... बकुळीच्या फुलापरी...

lockdown... लॉकडाऊन