lockdown... लॉकडाऊन

 पुन्हा एकदा बंद होणारे सगळं... 

थकायला झालंय आता-

काम न करताच मेंदू थकतो हे गेल्या वर्षी याच महिन्यांनी दाखवून दिलं होतं.. 

आता पुन्हा तेच- 

अत्यावश्यक सेवा सुरु असतील..

बाकी रिक्षा वाल्यांना अमुक इतके पैसे- रस्त्यावरच्या फेरी वाल्यांना तमुक एक परवानगी-भाजीपाला दुध सुरु राहील. आणि हॉटेल मधून पार्सल व्यवस्था सुरु राहील..

यापेक्षा काही वेगळं नाहीये नियमावली मध्ये-

म्हणजे पुन्हा आरशा समोर उभं राहून थोबाडीत मारून घेत स्वत:ला विचारायचं की का आलो आपण entertainment industry मध्ये?

का लेखक अभिनेते निर्माते संगीतकार गायक कोरिओग्राफर  झालो?

का दिग्दर्शक spot boy, lightman, setting dada, मेकपमन, शेड्युलर झालो...??

चित्रपटसृष्टी आणि मालिकांचं जग कधीच अत्यावश्यक सेवेत येत नाही- मान्य आहे. आमची काय किंमत आहे हे सगळ्या राजकीय पक्षांनी आणि जनतेने दाखवून दिलं सोशल मिडिया वरच्या कमेंट्स मधून- म्हणे शेतकरी मरतोय आणि यांना सिरियल्स ची पडली आहे.

शेतकरी मरतोय त्याचं प्रचंड दु:ख आहेच पण ज्यांच्या मरण्याची दखल घेतली जात नाही असे चित्रपट मालिकांच्या क्षेत्रातले मिडलक्लास लोक दिसत राहतात समोर त्यांचं काय?  दुस-याला दिलेल्या सहानुभूती च्या आगीने आपली चूल पेटत नसते त्याचं काय?

आम्ही अत्यावश्यक नसू पण दखल घेण्याजोगं काम नक्कीच करतोय. 

आम्ही गरीब नसू पण श्रीमंतही नाही-   

घरभाडं, मुलांच्या शाळांची फी, सोसायटीची बिल, विजेचं बिल, किराणा सामान, बँकेचे हफ्ते... हे सगळं आम्ही दर महिन्याला येणा-या चेक्स मधून देतो आणि ते चेक मेहनत करून कमावतो- अशा industry मध्ये काम करून- जी दुर्दैवाने अत्यावश्यकही नाही.. आणि आम्हाला कोणतंही बेरोजगारीचं package सुद्धा नाही. लोकांचा तर ठाम समज आहे की तुम्ही entertainment industry मध्ये काम करता म्हणजे तुमच्या कडे मस्त पैसा असतो.. instagram वरचे फोटोज बघून आमचा एकमेकांबद्दल सुद्दा होतो हा गैरसमज ....

काश.......

आता कुठे स्वत:ला सावरून उभी राहिली होती आमची industry... आता पुन्हा हे सगळं..


पलीकडचा भाजीवाला भाव वाढवून tomato विकतो आणि किंमत कमी करायला गेलो तर "किसी औरसे खरीद लो-"म्हणतो.. तेव्हा आरशा समोर उभं राहून थोबाडीत मारून घेत स्वत:ला विचारायचं  की का आलो आपण entertainment industry मध्ये?


काश मालिकेमधल्या एखाद्या TRP न येणा-या track सारखा हा  lockdown चा ट्रॅक बदलता आला असता ....



Comments

Popular posts from this blog

RainbowMaker...

शब्द शब्द जपून ठेव... बकुळीच्या फुलापरी...