Posts

Showing posts from May, 2021

शब्द शब्द जपून ठेव... बकुळीच्या फुलापरी...

Image
  शब्द शब्द जपून ठेव...बकुळीच्या फुलापरी... पाडगावकरांच्या काही खास ठेवणीतल्या गाण्यातलं हे एक गाणं.... या गाण्याला बकुळीचा गंध आहे... मला स्वतःला बकुळ या फुलाबद्धल अनाम विचित्र भावना आहेत- मला त्याचा गंध आवडतो असंही नाही आणि आवडत नाही असंही नाही... त्यात मोग-याचा मादक दरवळ नाही , जाई जुईचा हसरा गंध नाही , सायलीची शांत सुगंधी झुळूक नाही.. चाफ्याचा टवटवीतपणा नाही , इतकंच काय गुलाबाचा दिखावूपणा पण नाही... पण त्यात काहीतरी विलक्षण आहे- जी ए कुलकर्णींच्या कथांसारखं , आरती प्रभूंच्या कवितांसारखं.... काहीतरी अनवट.... जाउदे... शब्दांबद्धल बोलायचं तर बकुळीविषयीच बोलत बसले... शब्द शब्द जपून ठेव हे त्यांनी वेगळ्या अर्थाने म्हटलं असलं तरी आपण लिहिलेले शब्द जपून ठेवावेत असं मला कधीच वाटलं नाही- ते जपून ठेवले तर त्यांनाही बकुळफुलांसारखा वास येईल असं काहीतरी वेडपट असावं माझ्या डोक्यात... म्हणजे गाण्यांबद्धल बोलतेय मी हे सगळं... मला आधीच गाणी लिहून ठेवणं जमत नाही... कविता म्हणाल तर ती मी लिहायला बसले म्हणून येतच नाही- ती प्रचंड मानी आहे... उंबरठा मधल्या स्मिता पाटील सारखी... (हे नुसतं म्हणतानाही

wanna lose weight?? #वजनदार

Image
  #गोलू पोलू एक ना वेळ येते , जेव्हा वाटायला लागतं , आता बारीक होणारच नाही आपण... माझ्या बाबतीत झालं होतं असं.. आणि गंमतीचा भाग काय असतो ना , आपण काय आहोत , आपली शैक्षणिक पात्रता , आपलं कर्तृत्व , आपण आपल्या कामावर किती प्रेम करतो , आपण आपल्या कुटुंबासाठी किती मेहनत करतो , आपण आजवर किती awards मिळवलीत किंवा आपल्याला जे जमतं ते खरंच अनेकांना नाही जमत.... या सग sssss ळ्या गोष्टी फील ठरतात हो- महत्वाचं काय तर तुम्ही जाडे झालात. बायकांच्या/मुलींच्या बाबतीत तर जास्तच- हे मला कळलं नाहीये फारसं, दोन बायका मिळून, दोन पुरुष मिळून किंवा एक बाई एक पुरुष मिळून एका पुरुषाच्या सुटलेल्या पोटा बद्धल त्या पुरुषाला ऐकू जाईल इतक्या आवाजात त्याच्याच तोंडावर बोलताना मी नाही पाहिलेत फारसे.. पण बाईच्या सुटलेल्या सगळ्या अवयवांवर यातल्या सगळ्या कॉम्बीनेशनचे लोक तिला मस्त कॉम्प्लेक्स देत असतात. शास्त्र असतंय ते!! एनीवे , बॉडी शेमिंग हा विषय नव्हता खरंतर- पण आठवत राहतात काही बाही गोष्टी- ..एका कार्यक्रमाच्या निवेदना नंतर सगळी कडून कौतुकाचा वर्षाव होत असताना मित्राची आई जवळ आली , पाठीवर थोपटल

lockdown... लॉकडाऊन

Image
 पुन्हा एकदा बंद होणारे सगळं...  थकायला झालंय आता- काम न करताच मेंदू थकतो हे गेल्या वर्षी याच महिन्यांनी दाखवून दिलं होतं..  आता पुन्हा तेच-  अत्यावश्यक सेवा सुरु असतील.. बाकी रिक्षा वाल्यांना अमुक इतके पैसे- रस्त्यावरच्या फेरी वाल्यांना तमुक एक परवानगी-भाजीपाला दुध सुरु राहील. आणि हॉटेल मधून पार्सल व्यवस्था सुरु राहील.. यापेक्षा काही वेगळं नाहीये नियमावली मध्ये- म्हणजे पुन्हा आरशा समोर उभं राहून थोबाडीत मारून घेत स्वत:ला विचारायचं की का आलो आपण entertainment industry मध्ये? का लेखक अभिनेते निर्माते संगीतकार गायक कोरिओग्राफर  झालो? का दिग्दर्शक spot boy, lightman, setting dada, मेकपमन, शेड्युलर झालो...?? चित्रपटसृष्टी आणि मालिकांचं जग कधीच अत्यावश्यक सेवेत येत नाही- मान्य आहे. आमची काय किंमत आहे हे सगळ्या राजकीय पक्षांनी आणि जनतेने दाखवून दिलं सोशल मिडिया वरच्या कमेंट्स मधून- म्हणे शेतकरी मरतोय आणि यांना सिरियल्स ची पडली आहे. शेतकरी मरतोय त्याचं प्रचंड दु:ख आहेच पण ज्यांच्या मरण्याची दखल घेतली जात नाही असे चित्रपट मालिकांच्या क्षेत्रातले मिडलक्लास लोक दिसत राहतात समोर त्यांचं काय?  दुस

मोहे रंग दे

Image
  मनावर मळभ आलं की मी रंंगांचा आधार घेते. चित्रकला काही खूप दर्जा वगैरे नाहीये माझी. पण   शब्द थकतात तिथे रंग पुढे होऊन हात धरतात माझा. विचार अनेकदा आवाज चढवून बोलतात... पडझड करत राहतात. पण रंग आले की कसला तरी वचक बसल्यासारखे मागे होतात overthinkingचे बुलडोझर ... रंग प्रवाही असतात, वाहून नेतात मनाच्या मर्यादा .. दु:खाची तंद्री लागते.  मग बाहेरचा अंधार कितीही गडद झाला तरी आत शांतपणे तेवत राहातात रंगांचे लामणदिवे.. #paintmeblue

Shabd Shabd japun thev....

Image
शब्द शब्द जपून ठेव...बकुळीच्या फुलापरी... पाडगावकरांच्या काही खास ठेवणीतल्या गाण्यातलं हे एक गाणं.... या गाण्याला बकुळीचा गंध आहे... मला स्वतःला बकुळ या फुलाबद्धल अनाम विचित्र भावना आहेत- मला त्याचा गंध आवडतो असंही नाही आणि आवडत नाही असंही नाही... त्यात मोग-याचा मादक दरवळ नाही, जाई जुईचा हसरा गंध नाही, सायलीची शांत सुगंधी झुळूक नाही.. चाफ्याचा टवटवीतपणा नाही, इतकंच काय गुलाबाचा दिखावूपणा पण नाही... पण त्यात काहीतरी विलक्षण आहे- जी ए कुलकर्णींच्या कथांसारखं, आरती प्रभूंच्या कवितांसारखं.... काहीतरी अनवट.... जाउदे... शब्दांबद्धल बोलायचं तर बकुळीविषयीच बोलत बसले... शब्द शब्द जपून ठेव हे त्यांनी वेगळ्या अर्थाने म्हटलं असलं तरी आपण लिहिलेले शब्द जपून ठेवावेत असं मला कधीच वाटलं नाही- ते जपून ठेवले तर त्यांनाही बकुळफुलांसारखा वास येईल असं काहीतरी वेडपट असावं माझ्या डोक्यात... म्हणजे गाण्यांबद्धल बोलतेय मी हे सगळं... मला आधीच गाणी लिहून ठेवणं जमत नाही... कविता म्हणाल तर ती मी लिहायला बसले म्हणून येतच नाही- ती प्रचंड मानी आहे... उंबरठा मधल्या स्मिता पाटील सारखी... (हे नुसतं म्हणतानाही मला इतकं छ