Posts

Showing posts from April, 2021

अंधार फार झाला..

Image
 थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला पणती जपून ठेवा  अंधार फार झाला आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे नाती जपून ठेवा अंधार फार झाला काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून घरटी जपून ठेवा अंधार फार झाला हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला हे  वाटतील परके आपुलेच श्वास आता हातात हात ठेवा अंधार फार झाला शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे हरणे जपून ठेवा अंधार फार झाला .. - anita

RainbowMaker...

Image
 I Paint My Own Rainbow..... ब्लॉग लिहिणं ही सवय व्हायला हवी खरं म्हणजे- जसं आंघोळ करतो रोज, (अं.... नाही चुकीचं उदाहरण- नाही म्हणजे आता रोज करतोच. पण given a choice.... hahahahaha! असो..) जसं जेवतो.. (हां ! ही सवय नाही आवड सुद्धा आहे..bingo!!)  अगदी रोज नाही पण आठवड्यातून किमान एक ब्लॉग... पण लेखकाचं मन फार विचित्र असतं. लेखक दुस-याच्या दु:खाने दु:खी होतो- लेखक समाजसेवक नसतो, (अपवाद) त्यामुळे तो उठून मदत वगैरे करायला जाईलच याची शाश्वती नसते- (पुन्हा, सन्माननीय अपवाद आहेतच) पण रायटर जळत राहतो आतल्या आत- जळती सिगरेट अर्धवट चुरडून टाकावी तसं  ब-या चाललेल्या दिवसातून अचानक बाजूला पडतो, विझून जातो- वरवर हसत राहतो पण आत उसवत राहतो... गेल्या वर्षी मस्त चाललेला माझा असाच एक ब्लॉग सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याने बंद पडला.. किती दिवस खड्डा पडला होता पोटात. तो अभिनेता होता, हिरो होता क्युट होता म्हणून नाही.. लोक म्हणतील लाख, त्याच्यासाठी का आसवं गाळायची ? मुद्दा तो खरा कोण होता हा नव्हताच- एखाद्याच्या मृत्यूचा जो बाजार मांडला जातो तो बघून सुन्न झाले होते. `मिडीया, इंडस्ट्री, मित्र, शत्रू , fans